Home Breaking News महावितरणने पंधरा दिवसात आदिवासी भागांमध्ये लाईन चालू करण्याचे स्वप्न दाखवून … कुंभकर्णा...

महावितरणने पंधरा दिवसात आदिवासी भागांमध्ये लाईन चालू करण्याचे स्वप्न दाखवून … कुंभकर्णा सारखे झोपले

392
0

 

आदिवासी भागांमध्ये राजकीय लोकांच्या ढवळाढवळी मुळे आदिवासी विद्युत लाईन पासून वंचित…

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांचे पुनर्वसन 2017 ला झाले.
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिंगळी बु जवळ असलेल्या एक किलोमीटर अंतरावर रोहन खिडकी गाव बसले त्या ठिकाणी तीन वर्षे होऊन सुद्धा कुठल्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या पण सोनाळा येथील महावितरण अधिकारी श्रीराम बोदळे यांच्या पाठपुराव्याने त्याठिकाणी विद्युत लाईन जी मंजुरात देण्यात आली. मंजुरात देऊन बोदडे यांनी आपल्या कार्य पंधरा दिवसात पूर्ण केले. काम पूर्ण होऊन दोन महिने झाले. पण पण वरिष्ठ महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी परवानगी देण्याकरता टाळाटाळ का करत आहेत. महावितरणचे यामध्ये काही काळा घोर तर नाही ना असा प्रश्न असल्याने त्या ठिकाणी लाईन सुरू होत नसल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
महावितरणला आदिवासी भागांत लाईन द्यायचं नव्हती तर रिकामा तमाशा आदिवासी बांधवांना का दाखवला. व त्यांना आठ दिवसात लाईन चालू करण्याचे स्वप्न का दाखवले असा प्रश्न आदिवासी बांधव करत आहेत.

(1)प्रतिक्रिया / सतीश कुमार वानखडे
संभाजी बिग्रेड जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा

आदिवासींना पंधरा दिवसात लाईन देण्याचे स्वप्न दाखवून राजकीय नेत्या सारखे भरोशावर बसवले…

Previous articleसांडपाण्याचे व्यवस्थापन करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा. स्वाभिमानी चा आंदोलनाचा इशारा
Next articleअभिनेता विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियात अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here