माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे सर्व चे सर्व 18 संचालक या कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आले

आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार नेते पांडुरंग दादा पाटील व काँग्रेस पक्षाचे खामगाव विधानसभा मतदारसंघ पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल च्या वतीने शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी गोपाळराव मिरगे व उपसभापतीपदी श्रीकांत तायडे हे अविरोध निवडून आले नवनिर्वाचित सभापती व उपसभापती तसेच नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार आज रविवार 21 मे रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुंदजी वासनिक यांच्या हस्ते करण्यात आला

खासदार मुकुल वासनिक यांचे आगमन होताच सर्वप्रथम पांडुरंग दादा पाटील ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे ,माजी आमदार कृष्णराव इंगळे काँग्रेस पक्षाचे विजय अंभोरे शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती दयाराम भाऊ वानखडे, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तेजेन्द्र सिंग चव्हाण, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष किरण बापू देशमुख काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष मीराताई माळी ,काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती शेगावचे सचिव विलास फुंडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी खासदार मुकुल वासनिक यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment