सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
भारताचे माजी पंतप्रधान तथा भाजपचे दिग्गज नेते भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची अपमानकारक तसेच त्यांची बदनामी केल्याप्रकरणी नागपूरचे ज्ञानेश वाकुडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 17 जानेवारी रोजी भाजपचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक गजानन घुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देण्यात आली आहे ।या तक्रारीत त्यांनी असे नमूद केले आहे की ‘ज्ञानेश वाकुडकर यांनी .तर ” मुंडेच मंत्रीपद आणि वाजपेयी यांच भारतरत्न दोन्ही काढून घ्या ‘ ‘या मथळ्याखाली दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी दै .विदर्भ मतदार तसेच 15 जानेवारी रोजी विविध व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून ‘स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये तसेच त्यांच्या चारित्र्यावर टीका करून बदनामी कारक माहिती प्रसिद्ध केली !
स्व.अटल बिहारी वाजपेयी हे सर्वोच्च भाजपचे नेते होते व भारतरत्न सन्मानाचे धनी होते ‘त्यामुळे त्यांची व्यक्तीचा बदनामी नसून भारतरत्न पुरस्काराची देखील बदनामी आहे ।त्यामुळे सदरहू पक्षाची तसेच व्यक्तीच्या कार्यकर्त्याला मनस्ताप होत असून ‘आरोपीविरुद्ध कडक शासन करून गुन्हा दाखल करावाअशी मागणी यावेळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सिंदखेडराजा यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे !यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. गजानन घुले ‘सुरेश पिंपळे सुरेश शेळके एकनाथ मुरकुट ‘पांडुरंग पंडित अनंतराव खेकाळे ‘मधुकर जायभाये गजानन खांडेभराड ‘उत्तमराव उबाळे ‘विष्णू मेहेत्रे .दिपक घुगे ‘आदींच्या यावरती सह्या आहेत ‘