Home Breaking News माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी समाज भूषण अर्जुन गवई यांची निवड !

माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी समाज भूषण अर्जुन गवई यांची निवड !

300
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माजी सैनिक तथा समाज भूषण अर्जुन गवई यांची माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे !
ही नियुक्ती 12 जानेवारीला राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंती दिनी माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आली आहे !
त्यांच्या या निवडीमुळे सिंदखेड राजा तालुक्यातील संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधील माझी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे !
माजी सैनिक अर्जुन गवई हे अगोदरच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे असतात त्यातच माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आणखीन जबाबदारी त्यांच्यावर वाढली आहे !आपण तन-मन-धनाने माजी सैनिकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त विदर्भ अध्यक्ष अर्जुन गवई यांनी बोलताना दिली आहे !

Previous articleशिंदी येथे शेतातून ठिबक सिंचनचे ३५ हजार किंमतीचे 11 बंडल चोरीला !
Next articleआडगावराजा च्या तरुणाईचा अभिनव ऊपक्रम!! वाढदिवसाचा खर्च न करता अभ्यासिकेला देणार पुस्तके भेट!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here