मालोद येथे घराचे कुलूप तोडून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याची दागीने लंपास पोलीसात गुन्हा दाखल

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद येथील शेतकऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून २ लाख १९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरलीधर वना पाटील (वय-६३) रा. मालोद ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ जुलै रोजी रात्री १० ते ११.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले २ लाख १९ हजार रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मुरलीधर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

Leave a Comment