मा.आ.नरेंद्र पवार साहेब (भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या जालना दौरा निमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय जालना येथे आढावा बैठक संपन्न:

 

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक ०३/११/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना येथे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये मा.नरेंद्र पवार-भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे दि.०५/११/२०२२ रोजी शनिवारी जालना येथे येणार आहेत.यानिमित्त संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली.व कार्यक्रमाची रूपरेषा व आढावा घेण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मा.भास्कर आबा दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सखोल असे मौलाचे मार्गदर्शन केले आहेत.तसेच जालना जिल्ह्यातील व तालुक्यातील भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.तसेच यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे,तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,गोवर्धन कोल्हे(स्वीय सहाय्यक),जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार,युवा अध्यक्ष उद्धव जायभाये व तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड,संजय रंधवे,विठ्ठल नरवडे,भारत मुटकुले याठिकाणी उपस्थित होते.

Leave a Comment