मॅरेथॉन स्पर्धेत भिंगारा शाळेतील विद्यार्थ्यांचा दबदबा……यशाची परंपरा कायम.

 

बुलढाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा , बुलढाणा येथे आज दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भिंगारा तसेच निवासी वस्तीगृह भिंगारा येथील 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता…

त्यापैकी

बसंती सियाराम सस्त्या वर्ग सातवा या विद्यार्थिनींने 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे..

संतोष सोळंकी वर्ग सातवा याने पाच किलोमीटर मॅरेथॉन मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पूजा दिनेश राऊत वर्ग आठवा हिने पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुली मधून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

वैशाली मुकेश खरात हिने मुली मधून तीन किलोमीटर मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

शिवम टेटीराम राऊत वर्ग सहावा मुलांमधून तीन किलोमीटर मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे .

बक्षीस बक्षीस वितरणा दरम्यान विद्यार्थ्यांनी माननीय जिल्हाधिकारी रामामुर्ती साहेबांसोबत संवाद साधला…. त्याचबरोबर बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा श्री राधेश्यामजी चांडक यांच्या सोबतही विद्यार्थ्यांनी संवाद साधला..

सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना भिंगारा ते बुलढाणा ने आण करण्यासाठी वनविभागाची व्हॅन वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री किशोर पडोळ साहेब यांनी उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार…!

विद्यार्थ्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था उपवन रक्षक अधिकारी ,बुलढाणा माननीय श्री जायभाये साहेब यांनी वन विभागाच्या रेस्ट हाऊसला करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..

विद्यार्थ्यांची मॅरेथॉन ची अगदी बालपणापासून तयारी घेणारे सलाईबन येथील सामाजिक कार्यकर्ता तसेच पर्यावरण प्रेमी आदरणीय मनजीत जी सिंग यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले तसेच विद्यार्थ्यासमवेत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार …

ज्यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून विद्यार्थ्यांची स्किल बेस्ड प्रॅक्टिस चालू आहे असे आदरणीय गटशिक्षणाधिकारी फाळके साहेब यांचे सुद्धा खूप खूप आभार

सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सुध्दा अभिनंदन आणि सहकार्याबद्दल आभार प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना उलट्या व अशक्तपणा आला म्हणून 4/5 बक्षिसानी हुलकावणी दिली .. पुढच्या वेळेस हुलकावणी दिलेली बक्षिसे नक्कीच खेचून आणू..

Leave a Comment