Home Breaking News मोठी ब्रेकिंग न्यूज़ दंगल प्रकरणी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळांसह सहा जणांना अटक

मोठी ब्रेकिंग न्यूज़ दंगल प्रकरणी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळांसह सहा जणांना अटक

849
0

 

सुनील पवार नांदुरा

नगराध्यक्ष हरीश रावळांसह इतर पंचवीस लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल प्रकरण,

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका व्यक्तीस , त्याने दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यास नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांचेसह पंचवीस लोकांनी त्यास बेदम मारहाण केली होती व बेकायदेशिर मंडळी जमा करून पोलिसांचा आदेश धुडकाविल्या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, शिवाजी नगर येथील किरण साळुंके हा दि . १७.११.२०२० रोजी रात्री ९ .०० वाजता दारूचे नशेत हरीश रावळ यांच्या घरी आला व अश्लील घाणेरडी शिवीगाळ करू लागला असता , त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा तो शिवीगाळ करून , धमक्या देवून घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला हरीश रावळ , प्रमोद उज्जैनकर , निरंजन लेले , संतोष उज्जैनकर यांचेसह पंचविस लोकांनी लाठया काठयांनी बेदम मारहाण केली त्यावेळी पोलिस उभे असताना पोलिसांचेही काही न ऐकता बेकायदेशिर मंडळी जमवुन हा प्रकार चालुच असल्याने , किरण साळुंके हे जखमी झाले व त्यांनी शहर पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिल्यावरून पोलिस स्टेशन , मलकापूर शहर यांनी गुन्हा रजिनं . ६२ ९ / २०२० कलम ३२४ , ३२३ , १४३ , १४७ , १४ ९ , २६ ९ , २७० , १८८ , ५०४ , ५०६ भा.दं.वि तसेच कलम १३५ मु पो का . अन्वयज हरीश रावळ यांचेसह इतर पंचविस लोकांवर दंगल करून बेकायदेशिर मंडळी जमवुन मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्यांच्या आधारे नगराध्यक्ष हरीश रावळांसह सहा जणांना आज सकाळी 11 वाजता अटक करण्यात आली आहे, पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहे.

Previous articleकापूस पिकाचे पंचनामे करून हेक्टरी तीस हजार रुपये मदत देण्यात यावी.= सत्याग्रह शेतकरी संघटना
Next articleभारताच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here