यावल कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यअभिषेक दिनाचा कार्यक्रम संपन्न

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाव्दारे संचलीत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिना निमित्त इतिहास विभाग व विदयार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . महाविद्यालयाच्या दालनात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ए पी पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणुन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ अनिल पाटील यांनी रयतेचा राजा हिंदवी स्वराज्य संस्थेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देऊन राज्यभिषेकाचे महत्व, कारणे, परिणाम यांचे महत्वपूर्ण विवेचन केले, या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नरेंद्र पाटील यांनी केले तर या शिवराज्यअभिषेक कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मिलिंद बोरघडे यांनी मानले
सदरील कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, संतोष ठाकूर, डी डी पाटील, प्रमोद भोईटे, अनिल पाटील, तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Comment