Home राजकारण यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या उमेदवारी दाखलच्या तिसऱ्या दिवसी७४ अर्ज दाखल

यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या उमेदवारी दाखलच्या तिसऱ्या दिवसी७४ अर्ज दाखल

410
0

 

 

यावल तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक रणधुमाळीला वेग आला असुन आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसी एकुण ७४ ईच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले आहे . दरम्यान मागील तिन दिवसाच्या शासकीय सुटीच्या विश्रांतीनंतर दिनांक २८ डिसेंबर पासून पुनश्च ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावणाऱ्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी ईच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयावर एकच गर्दी केली होती . यावल तालुक्यात एकूण ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुक दिनांक १५ जानेवारीस पार पडणार असुन , उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दिनांक ३० डिसेंबरपर्यंत असुन ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवाराच्या अर्जांची छाणणी व त्याच दिवसी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे . आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकुण ७४जणांचे अर्ज प्राप्त झाले असुन , यात सर्वाधीक उमेदवारी अर्ज १ १हे वड्री ग्रामपंचायत व१० अर्ज कोरपावली ग्रामपंचायती करीता दाखल झाले असून , बामणोद व बामणोदसाठी प्रत्येकी ९ उमेदवारी अर्ज , मोहराळे गृप , पिंपरूड , ग्रामपंचायती करीता ६ अर्ज , हिंगोणे , सांगवी बु॥ , प्रत्येकी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे . यात अंजाळे गृप , महेलखेडी , अट्रावल , मारूळ गृप , डोंगर कठोरा ,विरोदे , विरावली , डोणगाव या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी १ उमेदवाराने आपले अर्ज दाखल केले आहे .कोळवद , पिपंरूड प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल असुन , किनगाव बु॥साठी ३ आणी नायगावकरीता ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .

Previous articleजळगाव जामोद तालुक्यातील शासकीय तूर नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन होणार – प्रसेनजीत पाटिल
Next articleजुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here