यावल तालुक्यात पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमचं सर्वाधिक घरकूल,११६३ मंजुर तर ४१८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण

 

यावल तालुका( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल : तालुक्यात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमचं सर्वाधिक घरकूलांना मंजुरी मिळाली आहे. यंदा ड यादीतील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण मध्ये १ हजार १६२ लाभार्थ्यांच्या घरकुलास मंजुरी देण्यात आली असुन त्यातील ४१८ लाभार्थ्यांना ६२ लाख ७० हजारांचा पहिला हप्ता वितरण झाला आहे तर उवर्रित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभ वितरणाची कार्यवाही सुरू आहे.या पुर्वी तालुक्यात सन २०१६- १७ मध्ये सर्वाधिक घरकुल लाभली होती.
यावल तालुक्यात यंदाच्या सन २०२१ – २०२२ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजने करीताचे उध्दीष्ट १ हजार ६३२ देण्यात आले होते. तेव्हा यातील १ हजार १६३ लाभार्थ्यांच्या घरकुलास मंजुरी देण्यात आली व त्यातील पहिल्या टप्प्यात ४१८ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार प्रमाणे पहिला हप्ता रक्कम एकुण ६२ लाख ७० हजार रूपये वितरण करण्यात आली आहे तर उवर्रित ७४५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाची कार्यवाही सुरू आहे. या करीता पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, घरकुल विभागाचे मिलींद कुरकूरे ऑनलाइनचे कामकाज पाहत आहे. तर यंदा पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक घरकुलांना मंजुरी मिळाली आहे या पुर्वी सन २०१६-१७ या वर्षी १ हजार ४८२ घरकुलांना मंजुरी मिळाली होती व त्यातील तब्बल १ हजार ३६२ घरकुल पुर्ण झाले होते. त्यानंतर मात्र, अल्प प्रमाणात घरकुल तालुक्यात लाभली होती तेव्हा यंदा चांगल्या प्रमाणात घरकुलांचा लाभ तालुक्यातील ग्रामिण भागात मिळाल्याने १ हजार १६३ गरजुंना हक्काचे घर मिळणार आहे.
असे झाले घरकुल.
सन २०१६ – १७ – १ हजार ४८२ घरकुलांना मंजुरी. १ हजार ३६२ घरे पुर्ण.
सन २०१७ – १८ – ५९१ घरकुलांना मंजुरी. ५६२ घरे पुर्ण.
सन २०१८ – १९ – ४८५ घरकुलांना मंजुरी. ४०८ घरे पुर्ण.
सन २०१९ – २० – ९५९ घरकुलांना मंजुरी. ६८१ घरे पुर्ण.
सन २०२० – २१ – ४३२ घरकुलांना मंजुरी. २२७ घरे पुर्ण.

राज्य सरकार कडील घरकुल.
गेल्या पाच वर्षात सन २०१६ पासुन ते आज पर्यंत राज्य सरकार कडून रमाई घरकुल योजनेत ८९७ घरकुलांना मंजुरी मिळाली होती व त्यातील ६५७ घरकुल पुर्ण झाली तर शबरी आवास योजनेत ५९२ घरकुलांना मंजुरी मिळाली व ५४९ घरकुल बांधली गेली तर यंदा रमाई योजनेत ३७५ व शबरी योजने ७४ घरकुल मंजुर आहे.
४ टप्प्यात निधी.
पहिला १५ हजार, दुसरा ४५ हजार, तीसरा ४० हजार व अंतिम २० हजार अस एकुण ४ टप्प्यात १ लाख २० हजार रूपये ग्रामिण करीता घरकुल करीता निधी मिळतो.

Leave a Comment