यावल पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत रुजू कार्यभार सांभाळले

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून यावल पोलीस ठाण्यातील रिक्त पदावर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हे रुजु झाले असुन त्यांनी शुक्रवार पासून कार्यभार हाती घेतला आहे . यावल पोलीस ठाण्यात मागील तिन महीन्यांपासुन कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे (आयपीएस) यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाल संपल्याने आशित कांबळे यांनी प्रभारी अधिकारी पदाचा पदभार सोडला असुन त्यांच्या रिक्त झालेल्या पोलीस निरिक्षक पदावर जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी यावल पोलीस स्टेशनचा कार्यभार आज हे आज पासुन घेतले आहे . पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी पदभार स्विकारल्यावर यावल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले , पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Comment