यावल /विकी वानखेडे
नऊ महिन्यांपासून यशस्वीपणे सांभाळला पदभार
यावल नगरपरीषदेत मार्च 2022 पासून मनोज म्हसे यांची पदभार सांभाली होता मात्र प्रशासकीय कारणास्तव त्यांची मुरबाड, जि.ठाणे येथील नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली झाली आहे.
मनोज म्हसे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे आदेश 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीचे पत्र येथे प्राप्त झाले आहे.
यावल नगरपरीषदेचा पदभार आता कुणाकडे जातो? याकडे लक्ष लागले आहे