यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण शेड्अल बँकेचा वर्धापन दिन ग्राहक ,व्यापारी आणी शेतकरी यांच्या उपस्थित संपन्न

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा १४वा वर्धापन दिन ग्राहक ,शेतकरी,व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावल शहरातील नागरीकांच्या तत्पर सेवेशी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण शेड्रअल बँकेचा १४ वा वर्धापन येथील शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बॅंकेच्या शाखेतील दालनात संपन्न झाला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी प्रमोद नेमाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सचे व्यापारी पिन्टू सोनार व बॅंकेच्या यावल शाखेचे व्यवस्थापक हिंगणेकर , सुरेश पाटील, अय्युब पटेल , सुनिल गावडे, तेजस यावलकर, अशोक तायडे यांच्यासह आदी मान्यवर व परिसरातील ग्राहक आणी शेतकरी बांधव याप्रसंगी उपस्थित होते .

दरम्यान १९७६ साली स्थापन झालेली बँक ही भारत सरकार उपक्रम असलेली व बॅंक ऑफ महाराष्ट्र व्दारा पुरस्कृत असलेली ही बँक पुर्णत : सरकारी मालकीची आहे व विविध बॅंकांच्या एकत्रीकरणातुन २६ / ०६ /२००९ रोजी आस्तित्वात आलेली बँक असुन , महाराष्ट्र राज्यात या बँकेच्या ४२२ शाखा असुन, बँकेचा २५००० कोटीचा व्यवसाय आहे .

बँकेंच्या यावल शाखेत वर्धापना दिना निमित्त विविध विमा योजनेचे श्रीमती चंद्रकला प्रविण तळेले ( अपघात विमा ) गोविंदा खैरे ( अपघात विमा ) , गोविंदा पोपट माळी, ( प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा ) जितेन्द्र जोहरी ( प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा ) अशा चार लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले .

यावेळी प्रमोद नेमाडे,पिन्द्ग सोनार यांनी आपले विचार मांडलेत मयुर यांनी बँके संदर्भातील विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली ,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुधाकर बाउस्कर यांनी मानले .

Leave a Comment