यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील वनविभागाच्या वृक्षतोड माफीयाच्या विरूद्ध सुरू असलेल्या मोहीमेला आणखी एक मिळाले असुन , सावदा येथे वन विभागाच्या धडाकेबाज कार्यवाहीत सुमारे दोन लाख रूपयांचे सागवान वृक्ष जप्त करण्यात आले असून , या कार्यवाही मुळे सातपुडाजंगलातील मोल्यवान वृक्षांची अवैद्यवृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणवे आहे . या संदर्भातील मिळालेली सविस्तर माहीती अशी की, दिनांक २५ ऑगस्ट२o२२ रोजी धुळे वनसंरक्षक डिंगबर पगार, वनवृत्त पद्मनाभ एच एस (उपवनसंरक्षक , यावल वनविभाग जळगांव ), प्रथमेश हाडपे (सहाय्यक वनसंरक्षक यावल ) , यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या सुत्रांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यावल पुर्व विभाग आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर प्रादेशिक यांनी संयुक्तरीत्या मौजे सावदा नगरपालिका हद्दीतील शिवगंगा नगर मधील गणेश कोळी यांच्या मालकी चे बांधकाम चालू असलेल्या घरात अवैधरित्या विनापरवाना,विनानिर्गत पासेस,विनाशिक्काचे मौल्यवान साग इमारती चौरस लाकूड *नग-११८, घ.मी-१.७४१,किंमत १,५६,०००/ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला . चौकशी दरम्यान लाकूड मालक आरोपी नामे नंदुकिशोर अरुण चोपडे रा.निबोरा स्टेशन,रावेर यांनी नविन घरबांधनी व फर्निचर तयार करीत अवैध विक्रीकरण्यासाठी साग लाकडे अवैध वाहतुक करुन घरा मध्ये दडवून ठेवला होता.सदर कार्यवाहीत वनक्षेत्र रावेर मधील वनपाल रावेर यांनी भारतीय वन अधिनियम१९२७ आणि महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अन्वये प्रथम रिपोर्ट क्रमांक ०५ / २०२२ चा वनगुन्हा नोंद करण्यात आला असुन. सदरील सागवान माल जप्त करून पुढील तपास चालू आहे. या कार्यावाहीत विक्रम पदमोर (वनपरिक्षेत्र अधिकारी यावल ) , अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनपाल- रवींद्र सोनवणे,वनरक्षक- गोवर्धन डोंगरे, कृष्णा शेळके, भैय्यासाहेब गायकवाड , संभाजी सूर्यवंशी, श्री राजू बोंडल, युवराज मराठे श्रीमती आयशा पिंजारी, श्रीमती कल्पना पाटील, श्रीमती सविता वाघ,श्रीमती अरुणा ढेपले, वाहन चालक पार्क चव्हाण, विनोद पाटील आणि
अधिसंख्य वनमजूर यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही केली.