रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला शेगांव शहर पोलिसांनी दिले पालकांचे ताब्यात

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

 

आज दि. 21/06/2023 रोजी शेगांव शहरात पोलीस पेट्रोलिंग दरम्यान एक अल्पवयीन मुलगा मिळून आला. त्यास पोलिसांची त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अभयकुमार संजय मोहता वय 10 वर्षे सांगितले त्यास त्याच्या घराचा पत्ता व घरून निघून आल्याचे करणाबाबत विचारणा केली असता.

त्याने अगोदर काही सांगितले नाही परंतु नंतर त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो मराजपुर जि. साहागंज झारखंड ह. मु. शिवणी अकोला येथील रहिवाशी असल्याचे सांगून रागाच्या भरात घरून निघून गेल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नमूद मुलाचा ताबा त्याचे पालक अडव्हकेट किशोर खंडारे यांना देण्यात आला.

Leave a Comment