राष्ट्रवादीचा मोर्चासह धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यासआंदोलनाचा इशारा – सौ नंताताई पाऊलझगडे

 

विठ्ठल अवताडे ( जिल्हा प्रतिनिधी)

स्थानिक शेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय विविध मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला ,या मध्ये वाढीव तीस गावाला पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा ,

रखडलेले लंपि आजाराचे अनुदान तत्काळ मिळणे ,अंनसुरक्षेतून शेतकऱ्यांची वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावे , तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक विमे,आणि अल्पभूधारक शेकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांच्या जीवन हमी साठी आमदमी विमा योजनेचे नूतनीकरण करून पूर्ववत सुरू करण्यात यावी ह्या प्रमुख मागण्या घेऊन आज मोर्चा निघाला आणि तहसील येथे धरणे आंदोलन ही करण्यात आले मागण्या तत्काळ मान्य कराव्या अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला ,

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव सौ नंदाताई पाऊलझगडे , तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे,पांडुरंग पाटील शहर अध्यक्ष दिनेश साळुंके , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे यांच्या सह तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत मोर्चा नंतर धरणे आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तर प्रतीलीपी मा. कृषिमंत्री , मा. पाणीपुरवठा मंत्री , मा.ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा मा. उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खामगांव यांना पाठवण्यात आले

Leave a Comment