राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम

 

२८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता;
पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन पथक मुंबईकडे

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि. ८ (जिमाका)-राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्याची तपासणी व तपासणी निदानानंतर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात.

या अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक निदानानंतर ७६ बालकांची तपासणी हृदय संबंधिता आजारांसाठी करण्यात आली. त्यात २८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन आज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे पथक मुंबई येथे रवाना झाले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून विशेष बसने हे पथक बालकांना घेऊन रवाना झाले. बालकांसमवेत त्यांचे पालकही असणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना हाढोळे तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात शाळा तपासणीत हृदयरोगाशी संबंधित जटीलतेची लक्षणे दिसून आलेल्या ७६ बालकांची दि.१६ ऑक्टोबर रोजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात टु डी इको चाचणी करण्यात आली. या चा

Leave a Comment