राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महत्वपूर्ण बैठक आज शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव.राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा ह्या या बैठकीला अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या विविध समस्येबाबत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रा त विस्तारित करण्याच्या उद्देशाने सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या तसेच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांसाठी सतत लढा देणाऱ्या राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या सक्रिय पदाधिकारी असलेल्या उषाताई वनारे यांची

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर एकमताने निवड करण्यात आली सदर निवडीची घोषणा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी केली या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या उपस्थित महिला सदस्य व पदाधिकारी यांनी सौषा वनारे मॅडम यांचे अभिनंदन केले.

बैठकीला अकोला जिल्हाध्यक्ष सौ.लीनाताई पाचबोले मॅडम, अकोला जिल्हा सरचिटणीस फुलाबाई राठोड मॅडम, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रणिता धामंदे मॅडम, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस कुमारी स्नेहलता दाभाडे , कुंभार समाज महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई लंगोटे प्रदेश सरचिटणीस सौ. ज्योतीताई बावस्कर खामगाव तालुका अध्यक्ष सौ मंगलाताई हिवरकर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या शेगाव तालुका अध्यक्षा सौ शुद्धमती निखाळे कुमारी अनुशा निखाडे सौ वैशाली जोशी यांच्यासह राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अनेक महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या

Leave a Comment