राष्ट्रीय सल्लागार पदी ऊर्मिलाताईं ठाकरे यांची नियुक्ती

 

खामगाव नुकतेच दि.२३-०१-२०२१ रोजी नाशिक येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री मा.श्री.बबनरावजी घोलप
(नानासाहेब) यांनी खामगाव स्थित रहिवासी असलेल्या मुलूख मैदानी तोफ,वीरांगना झलकारीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त..अनेक शैक्षणिक,
सामाजिक,साहित्यिक पुरस्काराच्या राजश्री.. वनश्री ऊर्मिलाताईं ठाकरे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ,महिला आघाडीच्या राष्ट्रीय सल्लागार पदी निवड केली आहे.
या अगोदर गेल्या दहा वर्षापासून त्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कार्यन्वित होत्या.गेल्या सव्वीस वर्षापासून त्या या चळवळीत कार्ये करित असून त्यांनी आपल्या
कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.म्हणूनच मा.श्री.बबनराव घोलप उर्फ नानासाहेब यांनी त्यांच्या कामावर विश्वास टाकून संघटनेचे सर्वोच्च पद राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती करून गौरन्वित केले आहे.

या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Comment