Home वर्धा रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र...

रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व बाळ रोग तपासणी शिबीर संपन्न.

304
0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट:- आजच्या युगात बदलत्या जीवन शैलीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते.

याच उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यात आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबीर, बाल आरोग्य शिबीर (लहान मुलांची तपासणी), नेत्र/डोळे तपासणी शिबिर, रक्त तपासणी शिबीर, HIV तपासणी, CBC तपासणी, मानसिक समुपदेशन, सिकलसेल तपासणी, बिपी, शुगर तपासणी, थायराईड तपासणी अशा अनेक शिबीराला १००० हून अधिक रुग्णांनी या तपासणी शिबिरात सहभाग घेतला होता.

तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून काही पदाधिकाऱ्याकडून शेकडो रुग्णांना भिंत घड्याळ (वॉच) वाटप करण्यात आले .प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले, दीप प्रज्वलित करत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरात बाळरोग विशेषज्ञ डॉ अभिजित बोरकर, नेत्ररोग तज्ञ डॉ स्नेहल चौधरी MS, जीवन ज्योती ब्लड बँक चे डॉ प्रशांत सर, डॉ सतीश नक्षीने तसेच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील संपूर्ण डॉक्टरची चमू इत्यादी डॉक्टरानी रुग्णांची यशस्वीरित्या तपासणी केली. प्रस्तुत शिबीराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपूर्ण सेल च्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleअकोल्यात अतिक्रम हटवा मोहीम
Next articleपी.व्ही टेक्सटाइलच्या स्थापना दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here