लसनपुर येथे स्नेहमीलन सोहळा मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे-खा. तडस

 

हिंगणघाट नईम मलक

“धर्म हा कुठलाही असो मानवतार हा या धर्माचा गाभा असतो. अधात्म हे धर्माशी निगडित असून त्यातून सदविवेक, सदविचार, व समाजाची निर्मिती होत असते. सामाजिक जाणिवेतून माणुसकी चा धर्म शिकविणारे अधात्म हे एक सशक्त माध्यम आहे. समाज आणि मानव सेवा ही ईश्वरी सेवा या भावनेतुन आपल्या अगभुत कर्तुत्वाने समाजाला प्रेरक जाणीव करून देणारे आपले मोठेपण सिद्ध करते. असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी या प्रसंगी केले.
ते लसनपुर येथील हरी ओम गौ शाळा येथे आयोजित स्नेह मिलन सोहळ्यत बोलत होते.
यावेळी अड. सुधीर कोठारी, हरिओमगौशाला संचालक घनश्याम पुरोहित,ऑल इंडिया शास्त्री फोरम के राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान राही, कृ.उ. बा.स. समुद्रपुर के संचालक, सरपंच एड. वर्षा गनवीर, नगर पंचायत अध्यक्ष योगिता, उपाध्यक्ष बाबाराव ठुसे, जयहिंद सेवाभावी संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजू लभाने, निखील माकडे, चैतन्य कुमरे प्रमुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार रामदास तडस यांचा गौशाला आणि आई पेट्रोलियम द्वारे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना विक्रम वानखेडे तर संचालन एड. इब्राहीम बख्श आज़ाद यांनी आणि आभार प्रदर्शन राम बोरकर ने केले.

Leave a Comment