Home Breaking News लाखनी येथे फटाक्याच्या दुकानाला आग,11 लाखाचे नुकसान

लाखनी येथे फटाक्याच्या दुकानाला आग,11 लाखाचे नुकसान

200
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

लाखनी,दि.27ः येथील एका फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत फटका दुकानासह लगतचे कापड व फुलाचे दुकानही भस्मसात झाले. यात ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.लाखनी येथे सिंधी लाईनमध्ये अंबिका फटका सेंटर आहे. दिवाळी निमित्त या दुकानात फटकाने मोठ्यप्रमाणात ठेवले होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटक्यांचा आवाज येवू लागला. नागिकांनी धाव घेतली असता फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तात्काळ एका बांधकाम कंपनीचे पाण्याचे टँकर आणून आग विझविली. मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झाले होते. यात २ लाखांचे नुकसान झाले, तर लगतचे नागराज कोठेकर यांचे फुलांचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले, त्यात त्यांचे ७ लाखांचे तर लक्ष्मी कापड दुकानाचे दोन लाखाचे असे एकूण ११ लाखांचे नुकसान झाले.

Previous articleपगडीच्या साहाय्याने वृद्धाने घेतली फाशी; जळगाव जामोद शहरातील संध्याकाळची घटना
Next articleराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवंती सिंगनजुडेचे सुयश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here