लालडोंगरी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक-२ उत्साहात संपन्न.

 

चामोर्शी:-स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता पहिलीतील बालकांसाठी मागील वर्षापासून शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत “पहिले पाऊल कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.आगामी शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व विद्यार्थी शाळेत नियमित पणे यावेत विशेषता: इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल पात्र होणाऱ्या मुलांची १००% पटनोंदणी होऊन ते शाळेत नियमितपणे यावेत यासाठी राज्यस्तरावरून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

आज चामोर्शी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालडोंगरी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते,गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के,केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे व विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांच्या मार्गदर्शनाखाली
इयत्ता पहिलीत दाखल पात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक-२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालडोंगरी येथे मुख्याध्यापक संतोष गोटमुकुलवार व सहायक शिक्षिका जमाइलाही सय्यद यांच्या सहयोगाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मेळाव्यात सात प्रकारच्या स्टाल ची रचना करण्यात आली

होती.त्यामध्ये नाव नोंदणी,बौद्धिक विकास, शारीरिक विकास सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी आणि पालकांना समुपदेशन या कृत्यांच्या माध्यमातून
अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र बालकांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात येत आहे.शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी दाखल पात्र बालकांना प्रवेश देऊन त्यांची शाळापूर्व तयारी करून घेण्यासाठी काम सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात शाळापूर्व तयारी प्रथम मेळाव्याचे आयोजन दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले होते.
सदर मेळाव्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद विश्वकर्मा,उपाध्यक्ष गणेश मडावी,सदस्य संगीता विश्वास,राजेश तालेवार,भानुदास मेश्राम,अंगणवाडी सेविका निता उंदीरवाडे,स्वयंसेवक आशा चित्रपवार,बहुसंख्य माता पालक युवक हे प्रामुख्याने उपस्थित होते.मेळाव्याला उपस्थितांना विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी मार्गदर्शन केले.

शाळेत या वर्षी दहा मुलांना प्रवेशित केले आहे.
मेळाव्याची माहिती लिंक मध्ये भरण्यासाठी सूचना सुद्धा करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक संतोष गोटमुकुलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका जमाइलाही सय्यद यांनी मानले.

Leave a Comment