लिंगा . पांगरी काटे गटग्रामपंचायत साठी एका जागेसाठी तिहेरी लढत ! ६ जणांची अविरोध निवड !

 

सिंदखेड राजा (प्रतिनिधी )

साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या लिंगा -पांगरी काटे गट ग्रामपंचायत साठी सात सदस्य पैकी सहा सदस्यांची अविरोध निवड जवळपास निश्चितच मानला जात असून उर्वरित एका जागेसाठी तिहेरी लढत आहे ‘सात सदस्य निवडून देण्यासाठी अनेक अर्ज दाखल झाले होते परंतु निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी आणि गावात शांतता रहावी यासाठी गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत अविरोध करण्यावर भर दिला यासाठी ग्राम पंचायत अविरोध व्हावी यासाठी गावातील लोकांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला ‘यातून प्रतिसाद देत सहा सदस्य विरोध निवडले यामध्ये ‘अंबादास भिवसन काटे ‘नंदा दिनकरराव काटे ‘किरण रवींद्र काटे ‘कांताबाई शालिग्राम वाघमारे ‘शिवाजी लिंबाजी थिगळे ‘आणि लिंगा येथील शरद चेके यांचा समावेश आहे ‘तर दुसरीकडे लिंग येथील अनुसूचित जातीसाठी एका जागेसाठी .अशोक भालेराव . मधुकर भालेराव ‘नितीन भालेराव ‘यांच्या तिरंगी सामना आहे ‘त्यामुळे आता एका जागेसाठी प्रचार आणि जोर धरला असून ‘निवडणुकीनंतर कोण बाजी मारेल हे स्पष्ट होईल !

Leave a Comment