Home Breaking News लोणार तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा

लोणार तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा

480
0

 

शेतकऱ्यांना एकरी चाळीस हजार रुपये मदत द्या अन्यथा

अखेर आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन चिघळु नये म्हणुन पोलीसांनी ब-याच पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लोणार तहसील कार्यालयावर विदर्भ कार्यअध्यक्ष राणा चंदण यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी रफिकभाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा खटकेश्वर महाराज मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत घोषणाबाजी देत शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी स्वाभिमानी च्या वतीने करण्यात आली, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिवाळीला मंत्र्यांच्या घरी दिवाळी साजरी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आला राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ४० हजार रुपये मदत जमा करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी सांगितले कि प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन जिल्हा प्रशानाच्या मार्फत राज्य सरकारला अहवाल द्यावा अन्यथा मुंबई नागपुर राष्ट्रीय महामार्गवर चक्का जाम करु एकही चाक रस्त्यावर फिरणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला.यावेळी जिल्हाअध्यक्ष अध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले जिल्हाध्यक्ष रफिक भाई अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष लोणार सहदेव लाड तालुका उपाध्यक्ष सुनील मोरे मेहकर तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल तालुका उपाध्यक्ष गणेश जुनघरे देवेंद्र आखाडे सतीश वाघ मेहकर शहराध्यक्ष सदाशिव वडुळकर मेहकर शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे अशफाक शहा धीरेंद्र चव्हाण संजू भाऊ धावडे सनाउल्लाह शहा गणेश मोरे योगेश सोनुने सहा पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

Previous articleलोणवाडी ते पळशी रस्त्याची दुरवस्था
Next articleगाव पातळीवर सर्वे करून मदत मिळणे बाबत तलाठ्याला सत्याग्रह शेतकरी संघटनेतर्फे निवेदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here