लोणार येथील भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारणी जाहीर….

 

 

भारतीय जनता पार्टी लोणार तालुका ७३ समस्यांची कार्यकारणी जाहीर या कार्यकारणी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या घोषवाक्य प्रमाणे “सबका साथ सबका विकास और सबका विश्वास”याप्रमाणे सर्व स्तरातील नागरीकांना तालुका कार्यकारणी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
आ. डॉ. संजयजी कुटे, माजी आ. चैनसुखजी संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाशदादा फुंडकर, आमदार सौ.श्वेताताई महाले या सर्व मान्यवर यांनी सदरील तालुका कार्यकारणीला मान्यता दिल्यानंतरच कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी, लोणार तालुका अध्यक्षपदी भगवानराव सानप, तालुका सरचिटणीस गणेश तांगडे, देवानंद सानप, प्रकाश नागरे, सखाराम कुलकर्णी, तालुका उपाध्यक्षपदी संजय बुरुकुल, गणेश काकड, गजानन वाघ, सुरेश अंभोरे, सुबोध संचेती, कचरू डोळे, लक्ष्मण मोरे, गणेश राऊत, दिपक सांगळे, तालुका सचिव पदी जगन खोलगडे, अरुण तनपुरे, गजानन नागरे, विनोद कडाळे, संदीप हजबे, बद्रि कांगणे, कोषाध्यक्ष पदी दिलीप राठोड तर प्रसिद्धी प्रमुख म्हणुन भुषण शेटे यांची निवड झाली आहे. तालुका कार्यकारणीमध्ये १ तालुकाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ६ तालुका सचिव, १ प्रसिध्दी प्रमुख, १ कोषाध्यक्ष, ४ महीला सदस्य, ३२ पुरुष सदस्य, १६ कायम निमंत्रित असे एकूण ७३ सदस्यांची जम्बो कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.
तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढीसाठी प्रयत्न करणार असुन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, यामध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे. यानंतर होणाऱ्या सर्वच निवडणुका यामध्ये सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहे असा विश्वास तालुका अध्यक्षांनी वरिष्ठ मंडळीला दिला आहे.

Leave a Comment