वखारी येथे दिव्यांग दिन साजरा व साहित्याचे वाटप:

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना तालुक्यातील वखारी ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग दिनानिमित्त १८ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

सदर महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे.

त्यामुळे प्रहार पक्षाचे नेते तथा आमदार बच्चु कडु यांनी यासाठी खूप मेहनत व परिश्रम तसेच लक्षवेधी आंदोलन ही केली आहे.

त्यामुळे अपंग,विधवा,दिनदुबळ्या, गोरगरीब दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.त्यामुळे आमदार बच्चु कडु यांनी शासनाला वेळोवेळी लक्ष केंद्रित करून दिले आहे.

त्यामुळे या योजनेचे जनक म्हणून बच्चु कडु यांना दिव्यांग बांधवांनी श्रेय दिले आहे.आज वखारी ग्रामपंचायत येथे दिव्यांगदिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच काका पाटील घुले,ग्रामसेवक वझरकर साहेब,भारतीय जनता पार्टी अपंग सेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड,बाळु वाटोळे,छगन खैरे,भुजंगराव घुले,नामदेव घुले,रघुनाथ घुले,संजय पवार व अन्या गावकरी मंडळी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment