प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक
नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर भिलोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शिक्षक के.टी.पाटोळे व एस. टी.वाघ यांनी विद्यार्थीनींकडून राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले.उपाध्यक्ष मधूकरअण्णा नंद,सचिव पोपटरावजी कोरडे,संचालक नारायण जोरवर ,तूळशीराम पाटील, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,पत्रकार सिताराम पिंगळे,व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. सदगीर,पी.एस.डफाळ यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एम. ए.वाघ यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी समस्त विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.