Home Breaking News वसुलीसाठी महिलांना धमकावणाऱ्या महिंद्रा फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – रासप जिल्हाध्यक्ष...

वसुलीसाठी महिलांना धमकावणाऱ्या महिंद्रा फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर

375
0

 

 

वसुलीसाठी महिलांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या महिंद्रा फायनान्स च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
खामगाव येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे कार्यालय असून ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांना गृह कर्ज वाटप केले आहे. लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक परिस्थिती बेताची झाल्यामुळे कर्जदार कर्ज भरण्यास असमर्थ आहेत याबाबत रिझर्व्ह बँकेने सहा महिन्याची शिथीलता आधीच दिलेली होती. लॉकडाऊन उलटल्यानंतर आता प्रकरण न्यायप्रविष्ट असून वसुली करण्याचे आदेश अद्याप पावेतो आलेले नाहीत. असे असताना सुद्धा महिंद्रा फायनान्स चे मग्रूर अधिकारी व कर्मचारी व त्यांचे भाडोत्री गुंडे कर्जदारांना महिला – पुरुष असे न जुमानता अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमक्या देताना दिसून येतात. वेळोवेळी घरी चकरा मारून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घरी आणून महिलांना दमदाटी शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत आहेत.
सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी शिवदास सोनवणे यांच्याबाबत असा प्रकार घडला. महिंद्रा फायनान्स चे अधिकारी व कर्मचारी पवन अवचार महिलांना घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून पैसे देत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेत आजूबाजूच्या लोकांसमोर शिवीगाळ करून त्यांचा चारचौघात पाणउतारा करतात. तसेच घरातील वस्तू उचलून नेण्याचे धमकावत असतात.
शिवदास सोनवणे घरी नसताना महिंद्रा फायनान्स चे कर्मचारी पवन अवचार यांनी शिवदास सोनवणे यांचे घरी येऊन घरातील महिलांचे व घराचे फोटो काढले तेव्हा घरातील महिलांनी महिलांचे व घराचे फोटो पुरुष मंडळी घरी नसताना काढू नका . नियमानुसार कारवाई करायचे नोटीस देण्याचे सांगितले असता . आम्हाला वरून आदेश आहेत तुम्ही घरात राहतात. त्या घराचे मालक आम्ही आहोत. मी तुम्हाला कर्ज दिलेला आहे. आम्हाला शहाणपणा शिकवू नका पैसे भरा अन्यथा मार खायला तयार व्हा अशा धमक्या देत महिलांना शिवीगाळ केली. अशा गुंड प्रवृत्तीच्या अधिकार्यां वर त्वरित कारवाई करून प्रतिबंध करणे गरजेचे आहे. तरी मेहरबान साहेबांनी सदर निवेदनावर लक्ष देऊन महिंद्रा फायनान्स गुंडांना कारवाई करून जेरबंद करावे. फायनान्स कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष , अहिल्या सरकार संघटना व भैरव फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे लोकशाही मार्गाने संयुक्त आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर निवेदनावर धनश्रीताई काटीकर जिल्हाध्यक्ष रासप, प्रकाश ताटे जिल्हा संघटक, करणसिंग जिल्हा युवा अध्यक्ष , संतोष वानखेडे शहराध्यक्ष, शिवदास सोनोने जील्हा उपाध्यक्ष, सय्यद ताहेर , गीता सोनोने प्रदेशाध्यक्ष शिव अहिल्या शासन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleदेऊळगाव माळी येथे घडले माणूसकीचे दर्शन गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावले गावकरी
Next articleबच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here