वाघीण व दोन पिल्लांची दहशत परिसरात 3 जनावर जखमी तर 1 ठार

 

समुद्रपूर :- 17 सप्टेंबर
गिरड परिसरातील धोंडगाव ,हिवरा, बोतली , सावरखेडा ,सुकळी या गावा च्या आजू-बाजूला वाघीण व दोन पिल्ले फिरत आहेत.दोन दिवसात 3 जनावराला जखमी तर एक जनावराला ठार केले त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे .

वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर :-
:वनविभागाची टीम दाखल झाली आहे व परिसरात खैरगाव येथे 1 गाय मारली व 1 जखमी, सावरखेडा येथे 1 गाय जखमी, धोंडगाव येथे एक गाय गंभीर आहे सध्या वाघीण व दोन पिल्ले सावंगी परिसरात गेल्याचे माहिती आहे. सोबत कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहे . आमची दिवस रात्र पेट्रोलिंग सुरू राहणार आहे . जो पर्यंत वाघीण व पिल्लू जंगलात जात नाही तोपर्यंत आमची गस्त रात्रंदिवस सुरू राहणार आहे परस परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.
(नोंद :- प्रत्यक्षात एकच वाघ दिसला वाघीण व पिल्ले नव्हते )

Leave a Comment