संतोष काळे बाळापुर
वाडेगाव येथे बुधवारी सोफी चौक येथे नवनियुक्त तंटामुक्त अध्यक्ष तथा विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मानकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच मेंजर मंगेश तायडे, उपसरपंच सुनिल घाटोळ, प्रकाश कंडारकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मानकर, पंचायत समिती सदस्य अफसर खान ईसाखान, ग्रामपंचायत सदस्य राजु पळस्कार, हनीफभाई, तसेच मुजफ्फर हुसेन, दयाराम डोंगरे, डॉ सोहेल खान, अरुण पळसकार, दिपक मसने, सुनील मानकर, फकीर मोहम्मद शेख चाँद, सतीश सरप, अंकुश शहाणे, रामदास डोंगरे, राजेश जंजाळ, विजय डोंगरे, सुबोध डोंगरे,सोनु डोंगरे, आकाश इंगळे, आजम जमदार, मुजीब जामदार,आदी उपस्थित होते. यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत बहुमताने निवड करण्यात आलेल्या नवनियुक्त तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहम्मद अफ्तार तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विलास मानकर, उपाध्यक्ष गोपाल कंडारकर, संचालक अरुण काकड, श्रीधर सरप, मनोहर राहणे, दादाराव मानकर, पुरुषोत्तम गोतमारे, श्यामलाल लोध, संजय सरप, भीमराव डोंगरे, गोविंदा आंधळे, गोपाल वडतकार, आत्माराम गव्हाळे आदी सत्कारमूर्तीचा मान्यवराच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोहम्मद अफ्तार, मनोहर राहणे, श्यामलाल लोध, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र डोंगरे यांनी तर संचालन अँड सुबोध डोंगरे तसेच आभार प्रदर्शन अय्याज साहिल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक शेख सलीम शेख राहुल्ला, शेख मोहीन शेख ख्याजा, मोहम्मद मुजाहिद, अँड सुबोध डोंगरे अय्याज साहील, संदानंद मानकर, डॉ.शेख चाँद आदींनी परिश्रम घेतले.
__________________________________