विद्याभारती विदर्भ प्रांत हिंगणघाट तालुका बैठक बुधवार दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला एस. एस. एम.विद्यालय हिंगणघाट येथील परमपूज्य डॉ. हेडगेवार सभागृहात संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर श्री र.गं. धारकर अध्यक्ष विदर्भ प्रांत श्री ब.रा चव्हाण सदस्य विदर्भ प्रांत श्री गजानन सयाम वर्धा जिल्हाप्रमुख विद्याभारती शाळेचे मुख्याध्यापक श्री च. ज्ञा.खडतकर श्री सुपारे जिल्हाप्रमुख संस्कृती ज्ञान परीक्षा नवनियुक्त तालुका अध्यक्ष सौ.की.र मद्दलवार उपाध्यक्ष सौ.नी.ची बुरिले तालुका मंत्री श्री मिलिंद सावरकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन वंदनेने झाले यावेळी संगीत शिक्षक श्री गावंडे व श्री झाडे यांनी वंदना सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सयाम यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून विद्याभारती च्या कार्याची माहिती दिली तसेच तालुका कार्यकारणीची कार्य व जबाबदारी स्पष्ट केली यावेळी नवयुक्त तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. सौ मद्दलवार यांनी तालुका कार्यकारणीतील विविध जबाबदाऱ्यांची माहिती तालुका पदाधिकाऱ्यांना दिली.बैठकीत संस्था, शाळा ,विद्यार्थी सलग्नता व संस्कृती ज्ञान परीक्षा तसेच शैक्षणिक सत्र 2022 23 मधील कार्यक्रम व उपक्रम यावर चर्चा करण्यात आली यावेळी श्री सुपारे यांनी संस्कृती ज्ञान परीक्षेबाबत माहिती उपस्थितांना दिले श्री चव्हाण सर यांनी विद्याभारती अंतर्गत चालणाऱ्या सर्व शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती देऊन ते राबवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धारकर सर यांनी विद्याभारतीच्या कार्याची माहिती देऊन विद्याभारतीचे कार्य प्रत्येक शाळा प्रत्येक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान उपस्थित कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संस्कृत ज्ञान परीक्षा प्रमुख, सहप्रमुख,संपर्कप्रमुख व कार्यकर्ता बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री बुलदेव यांनी तर आभार श्री खडतकर यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट शांती मंत्राने झाला.