विहिरीत पडलेल्या रोहिला युवकांनी दिले जीवनदान !

0
460

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी मध्ये रोहि पडला होता परंतु युवकाच्या सतर्कतेमुळे रोहितचे प्राण वाचवण्यात यश आले आहे ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील शेतात घडली ।23 नोव्हेंबर रोजी विक्रम इंगळे यांच्या गट नंबर 180 मधील विहिरीत रोही पडला होता ही माहिती मिळताच ‘सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे व त्यांचे सहकारी सुधाकर इंगळे प्रभाकर इंगळे गणेश इंगळे प्रशांत इंगळे या सहकाऱ्यांना सोबत घेऊन !शेतातील विहीर गाठली .विहीर हे पूर्णपणे पाण्याने भरलेली होती काही करून रोहिचे प्राण वाचले पाहिजे या हेतूने संदीप इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोरी च्या साह्याने रोहित चे पाय दोरीने बांधून ।चौघांनी दोरी ओढून !रोहिला सुखरूप पणे पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीतून बाहेर काढले !त्यामुळे रोहिला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला सुखरूप पणे जंगलात सोडून देण्यात आले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here