गोंदिया-शैलेश राजनकर
गोंदिया,दि.26ः- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आव्हानाला साथ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदियाच्या वतीने वीज बिल माफ करण्याकरीता आज विश्रामगृह चौक परिसरात आंदोलन करण्यात आले. शासनाकडून जाहीररीत्या वाढीव वीज बिलावर कार्यवाही करून लवकरच वाढीव वीज बिल माफ करणार असल्याची घोषणाही केली गेली होती. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे कार्यवाही महाराष्ट्र शासनाकडून केली गेली नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातील जिल्ह्यात मोर्चाच्या माध्यमाने वाढीव वीज बिलाचा निषेध नोंदविण्याचे अल्टिमेटम दिले होते.परंतु शासनातर्फे कोणतेही कार्यवाही करण्यात आली नसल्याने मनसेने संपूर्ण राज्यभरात जिल्हा मुख्यालयात आंदोलन करण्याचे ठरवले. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदियाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलन कालेखा चौक येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. परंतु शासनाच्या निर्देशानुसार मोर्चा काढण्यासाठी शासकीय परवानगी नसल्याने पोलीस प्रशासनाने सदर मोर्चा काढण्यास निर्बंध लादले होते. त्यामुळे फक्त काही पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाण्यास परवानगी देण्यात आली.यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष मनिष चौरागडे, जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, मिलन रामटेककर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल हटवार, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे, आमगाव तालुका अध्यक्ष मुन्ना गवळी, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, गोरेगाव तालुका अध्यक्ष शैलेश जांभुळकर, तिरोडा तालुका अध्यक्ष पप्पू ढबाले, गोंदिया शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, विविध ग्रामीण शाखांतील शाखा अध्यक्ष, यांच्यासह मनसेचे माजी पदाधिकारी, राजसाहेब ठाकरे यांचे प्रेमी, सामान्य नागरिक व मनसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.