शहरातील पत्रकार प्रमोद जुमडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण,व वृद्ध मायबाप सोबत केक कापून साजरा

 

हिंगणघाट शहरातील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी आश्रय वृध्दाश्रम येथे वृद्ध मायबाप ज्यांचे कोणी नाही त्यांच्या सोबत केक कापून जन्मदिवसाचा हा आगळा वेगळा आणि अदभूत कार्यक्रम हिंगणघाट येथे पार पडला.या प्रसंगी माझे उद्योग मंत्री श्री अशोक भाऊ शिंदे, माजी नगरसेविका रवीलाताई आखाडे, सुरेश गायकवाड, विशाल जयराज, रोहित बसंतानी, संदीप वेलके, अश्विन तावडे, मयूर पाटील, राहुल दारूनकर, दिनेश वर्मा, सुखदेव कुबडे, अंकुश ससाने, गुणवंत वानखेडे दिलीप हिवंज, गोलू राऊत, कुणाल थूल, अनुराग जुमडे, व आदी मित्र ह्या मंडळी या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होते. गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रात सामाजिक कामात नेहमी वावरणारे. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आता अथक प्रयत्न करीत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यामध्ये सतत प्रत्येक क्षेत्रांमधील आगळ्यावेगळ्या बातम्या छापून समाजाला एक नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला.महसूल विभागाचा कोट्यवधीचा फायदा करून देण्यात त्याची महत्वाची भूमिका नेहमीच राहिली आहे त्या माध्यमातून त्यांनी त्यांची एक वेगळी छबी पत्रकार क्षेत्रात स्थापन केली. आता त्यांनी स्वतःचा मालकीचा साप्ताहिक सत्यअमृत असा पेपर ही चालू केला आहे.

Leave a Comment