राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांची उपविभागीय अधिकारी यांना मागणी…
हिंगणघाट :- मलक नईम
हिंगणघाट हे शहर वणा नदीच्या काठावर वसलेले मोठ्या प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे वणा नदीला पूर आला आणि संपूर्ण हिंगणघाट शहर पुराच्या पाण्यानी वेढलेले आहे पुराच्या पाण्याने शहरातील काही भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे या पुराचा पाण्यामुळे निशांनपूरा वॉर्ड, गाडगेबाबा वॉर्ड, शितला माता मंदिर, पिवळी मस्जिद, तेली पुरा चौक, भाकरा नाला परिसरात पाणी साचलेले होते, अनेक लोकांचा घरात पाणी शिरले आणि ते कुटुंब विस्कळीत झाले. तसेच घरातील गहू, तांदूळ, किराणा सामुग्री पाण्यात वाहत गेली तरी *अशा कुटुंबांना दहा हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व त्याची घरे पडली त्यांना एक लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली.
यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, अमोल मुडे, उमेश नेवारे, राजू मुडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.