शहरामध्ये चारचाकी वाहनातुन विदेशी दारूची वाहतूक 5,86,100 रू., माल जप्त

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :– 12 डिसेंबर रोजी मुखबीरचे विश्वसनीय खबरेवरून पोहवा. शेखर डोंगरे, ना.पो.शि.निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, व , सचिन भारशंकर यांनी कलोडे चौक, हिंगणघाट येथे नाकेबंदी करून मारोती स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-40 / KR-5590 यावर प्रो. रेड केला असता, कार चालक आरोपी स्वप्नील सुभाषराव हुलके व त्याचा साथीदार नितेश दिवाकर अराडे, दोन्ही रा. हिंगणघाट यांचे ताब्यातुन मारोती स्विपट डिझायर कार क्र. MH-40/KR-5590 चे डिक्कीमधुन पाच खोक्यामध्ये प्रत्येकी 375 एम.एल.च्या 106 विदेशी दारूच्या शिशा दारूने भरलेल्या किं. 63,600 रू. चा माल बिनापास परवाना बाळगुन त्याची अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मोक्यावर रंगेहात मिळुन आले.

आरोपीच्या ताब्यातुन मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू साठा व कार, दोन अॅन्ड्राईड मोबाईल व नगदी 2500 रू. असा 5,86,100 रू. चा माल जप्त केला. गुन्हा नोंद करून इतर आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.

Leave a Comment