Home Breaking News शहीद जवान वीर पुत्र प्रदीप मांदळे यांच्यावर उद्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...

शहीद जवान वीर पुत्र प्रदीप मांदळे यांच्यावर उद्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! पालकमंत्री यांच्याकडून जागेची पाहणी !

440
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वीर पुत्र शहीद प्रदीप माळंदेहे जम्मू काश्मीर येथील द्रास सेक्टर मध्ये 15 डिसेंबर रोजी मोठा बर्फाचा गोळा अंगावर पडून शहीद झाले होते !उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी त्यांचे मूळगावी पळसखेड चक्का येथे सकाळी 9.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे ।या संदर्भामध्ये दिनांक 18 डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदारडॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ज्या ठिकाणी शहीद वीरपुत्र प्रदीप मांदळे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली तसेच वीर पुत्र प्रदीप मांदळे यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली !पळसखेड चक्का येथील प्रदीप साहेबराव मांदळे हे भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंट मध्ये 2009 ला दाखल झाले होते !त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

Previous articleकुणाल ढेपे यांच्या बॅकलॉग परीक्षा संदभातील मागणीला यश.
Next articleअंत्रि खेडेकर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here