शिंदी येथे बचत गटांना उद्योगाबाबत मार्गदर्शन !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथेदिनांक 12 फेब्रुवारी रोजी सविस्तर माहिती मिळावी यासाठी महिलासाठी पुरुषासाठी उद्योग चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते ,महिलांनी केवळ बचत गट न स्थापन करता बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे !शिवाय छोटे छोटे उद्योगातून मोठी क्रांती घडेल -याबाबत सविस्तर मार्गदर्शन अविनाश खिल्लारे यांनी केले !उद्योगाच्या अनेक संधी आहेत परंतु पाहिजेत अशी मार्गदर्शन ग्रामीण भागातील महिलांना होत नाही अनेक रुपयाचा निधी हा शासन दरबारी पडून असतो !परंतु कोणी ते करत नाही ‘म्हणून महिलांनी उद्योगाबाबत सजग राहून उद्योग उभारावा व आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन उद्योग मार्गदर्शक अविनाश खिल्लारे यांनी केले ‘यावेळी त्यांचे सहकारी उमेश खारडे यांनी सुद्धा उद्योगाबाबत माहिती सांगितली ‘यावेळी महिला बचत गटाचे अध्यक्ष स्वातीताई मार्के ‘संगीताबाई खंडारे राजकोरबाई खंडारे मनिषा गिरी ‘बंगळे ताई खरातताई इतर महिला उपस्थित होते !कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय खंडागळे यांनी मानले ‘कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंढरी आटोळे अनील बंगाळे प्रल्हाद मोरे यांनी परिश्रम घेतले !

Leave a Comment