इस्माईलशेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येथील शिवाजी महाराज नगर परिसरात सार्वजनिक जागेवर पैशाच्या हारजीतवर बावन ताश्पत्त्यवर एक्का बादशहा नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली
या माहितीवरून कर्तव्यदक्ष डी वाय एस पी विवेक पाटील यांच्या आदेशाने शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे नायक पोलीस कास्टेबल गजानन गीते बक्कल नंबर 653 पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव बक्कल नंबर 23 97 पोलीस कॉन्स्टेबल विवेक इंगोले बकल नंबर 22 72 पोलीस कॉन्स्टेबल शांताराम घुये बक्कल नंबर 23 36 यांनी उपलब्ध ठिकाणी छापा मारला
यावेळी मधुकर उत्तमराव जाधव वय 67 वर्ष, सुभाष उत्तमराव तांबे वय 63 वर्ष संजय मधुकर तिडके वय 56 वर्ष संदीप चिंतामण देवकर वय 26 वर्ष शेख शकील शेख जहीर सुनील कृष्णराव सोलंकर या सहा जणांना पैशाच्या हारजीत वर ताशपत्त्यावर जुगार खेळतांना आढळून आले
पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळुन नगदी मोबाईल व ताशपत्ते असा एकूण 42, 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी नायक पोलीस कॉन्स्टेबल गजानन गीते बका नंबर 653 यांच्या फिर्यादीवरून कलम 12 मुंबई जुगलबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे