शिव सेना ने दिली मुख्याअधिकारी ला निवेदन

 

हिंगणघाट,, मलक नईम

आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोज शुक्रवारला हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने, शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री. बाळाभाऊ राऊत यांच्या आदेशाने तथा विधानसभा संपर्कप्रमुख श्री. रुपेश जी कांबळे व जिल्हा प्रमुख श्री अनिलभाऊ देवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली व वर्धा हिंगणघाट जिल्हा समन्वयक डाॅ. उमेश भाऊ तुळसकर यांचे सूचनेप्रमाणे तथा श्री. राजेंद्र खुपसरे उपजिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट नगरपरिषद चे मुख्याधिकारी मा.श्री. हर्षल गायकवाड साहेब, यांना हिंगणघाट शहरातील विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात :- १)हिंगणघाट शहरात~ मागील एक महिन्यापासून अतिवृष्टी पडल्यामुळे काही भागात पूर दृश्य परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शहरातील अनेक भागात तथा प्रभागात व मुख्य रस्त्यावर खड्डे तसेच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे .अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने चुरी किंवा मुरूम तात्काळ टाकण्यात यावा. २) तसेच अमृत योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम मागील पाच वर्षापासून रखडलेले आहे .या संदर्भात नगरपरिषद प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते .कारण तत्कालीन मुख्याधिकारी यांना शिवसेनेतर्फे निवेदन दिनांक :-4 एप्रिल 22 दिले त्यानंतर दिनांक:-8 ऑगस्ट 2022 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सदर विषयावर स्वतःच्या दालण्यात बोलवल्या बैठकीत, या समस्येवर संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अभियंता श्री.तपासे यांच्यासोबत चर्चा करून पाणीपुरवठा दिनांक:- 30 जून 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन सुद्धा दिले होते . असे पत्र सदर निवेदनासोबत जोडलेले आहे. परंतु या योजनेचे काम आज पर्यंत परिपूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरात व आमच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. ३) नगरपरिषदेने मागील वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव घेतला होता. त्या ठरावांमध्ये नगरपरिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जी. बी. एम कनिष्ठ महाविद्यालयातील chemistry, physics, biology साठी प्रयोगशाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी चा सामना करावा लागत आहे म्हणून प्रयोगशाळे च्या करिता संबंधित ठेकेदाराकडून खोली बांधण्याबाबत मंजुरी दिली होती. आता महाविद्यालय सुरू झाले असून सुद्धा प्रयोगशाळा साठी लागणारी खोली तयार करण्यात आलेली नाही. यावर आपण लक्ष घालून तात्काळ प्रयोगशाळा तयार करावी. ४) नगर परिषदेच्या टॅक्स विभागामध्ये कमी जास्त दोन हजार प्रकरणे प्रलंबित आहे. त्यामध्ये दाखलखारीच, फेरफार, तसेच कर आकारणी ची प्रकरणे इत्यादी, याबाबत मोका चौकशी नगरपरिषद अभियंता, यांच्याकडून होत होती .परंतु नगरपरिषद ने अचानकपणे कुठल्या नियमाला धरून मोका चौकशीचे अधिकार कर विभागातील असलेले कर्मचारी यांच्याकडे दिले आहे. त्यांना तांत्रिक अनुभव नसताना हे काम त्यांना देऊन मालमत्ता धारकाचे चुकीचे अंकेक्षण करून आर्थिक व्यवहार होताना दिसून येते आहे. त्यामुळे मालमत्ता धारकाचे आर्थिक नुकसान होन्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे निर्णय रद्द करावा. ५) झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये तसेच वार्डा- वार्डात गाजर गवत तसेच इतर झाडीझुडपी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ,त्यातून उत्पन्न होणारे कीटक व मच्छर, यामुळे परिसरातील चिखल व घाण झाली असल्यामुळे रोगराई निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. यासाठी उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने तन नाशक फवारणी व कीटकनाशक फवारणी करावी. ६) शहरातील वार्डात नाले व नाली सफाई योग्य प्रकारे होत नसल्यामुळे मलेरिया, डेंगू,हिवताप इत्यादी सारखे आजार व रोगराई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे .याकरिता नगरपरिषदेच्या स्वस्थ विभागातर्फे डी .टी .टी. पावडर, तसेच नाले व नालीवर कीटकनाशक फवारणी, परिसरातील धूर फवारणी मशीन (Fog Machine)द्वारे काम तात्काळ करण्यात यावे. ७) तसेच शहरातील मोकाट गुरे -ढोरे, जनावरे तथा श्वान मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ते मुख्य रस्त्यावर किंवा वरडळीच्या ठिकाणी ठान मांडून बसतात. त्यामुळे नागरिकांना आपले वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघात सुद्धा झालेले आहे .आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरे गुरे-ढोरे यांच्याकरिता कांजीवाडा सुरू करून त्यांना तात्काळ बंदिस्त करावे .तसेच श्वानाचे नसबंदी करून जेणेकरून त्याचा त्रास सर्व नागरिकांना होणार नाही. याची काळजी घ्यावी. ८) शहरातील विविध प्रभागात, नवीन विधुत खांबे लावण्यात आलेले आहे. जसे तुकडोजी वॉर्ड क्रं ६,५ ,ज्ञानेश्वर वॉर्ड क्रं ३,४,शास्त्री वॉर्ड क्रं १९, रामनगर, बिडकर, दत्त मंदिर वॉर्ड क्रं ७ या ठिकाणी लावन्यात आले. पंरतू नवीन LED लाईट लावण्यात आलेले नाही .त्यामुळे शहरातील काम करणारे व रोज मजुरी करणारे मिल कामगार, मजूर वर्ग यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. कारण त्यांना (ड्युटीमुळे) रात्रपाळी करून रात्री घरी यावे लागते, त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सर्व नवीन विद्युत खांबावर लवकरात लवकर एलईडी लाईट लावण्यात यावे. वरील सर्व विषयावर आपण जातीने लक्ष घालून समस्याचे निराकरण करावे व कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना हिंगणघाट तर्फे शिवसेना स्टाईल ने जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामला नगर परिषद सर्वशी जवाबदार राहील.निवेदन देण्याकरिता शिवसेनेतर्फे माजी न.पा. अध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमुख श्री. सतीश धोबे, शहर प्रमुख श्री सतीश ढोमणे ,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने , माजी नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, भास्कर ठवरे, शंकर मोहमारे, देवा पडोळे, कमलेश वाघमारे, उपशहर प्रमुख गजानन काटोले ,संजय पिंपळकर, विभाग प्रमुख रुपेश काटकर, मोहन तुमराम इ.शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment