इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
: शेगाव येथून शिव महापुराण कथास्थळ महेशपुर अकोला पर्यंत तात्पुरती 5 मे पासून 11 मे पर्यंत बस फेरी सुरू करण्यात यावी .अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने शेगाव बस डेपो प्रमुख जंजाळ साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जगप्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या मधुर आवाजात 5 मे ते 11 मे पर्यंत म्हैसपुर अकोला येथे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात आलेली आहे
शेगाव व परिसरातून या कथा श्रवणासाठी हजारोच्या संख्येने भाविक अकोला म्हैसपुर येथे जाणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या भाविका ंच्या सोईकरिता शेगाव ते कथास्थळ महेशपुर अकोला पर्यंत बस फेरी तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्यास भाविक प्रवाशांची सोय तर होणारच त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगाराला सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यसेवा प्राप्त होऊ शकतो
त्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव बस आगाराने 5 मे ते 11 मे दरम्यान सकाळी आठ वाजता पासून शेगाव बस स्थानकावरून म्हैसपूर अकोला कथास्थळापर्यंत बस फेरी सुरू करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने वाहतूक निरीक्षक स्वाती आंबेडकर मॅडम यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यावेळी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेचे अध्यक्ष माधुरी शर्मा ,साक्षी नाईक, वैष्णवी आवरकर,, साक्षी डुकरे ,ज्ञानेश्वरी बडे, स्नेहल शेगोकार ,पायल राऊत ,नम्रता निलाजे ,आकांक्षा सोनवणे, सचिन पालवे यांच्यासह शेगाव बस स्थानकावरील बस कर्मचारी प्रदीप जुंबळे उपस्थित होते