Home बुलढाणा शेतकरीपुत्र अभ्यासिकेची जनक रजेशभाऊ गावंडे यांच्या कार्याची शासनाचे दखल घ्यावी – विद्यार्थ्यांची...

शेतकरीपुत्र अभ्यासिकेची जनक रजेशभाऊ गावंडे यांच्या कार्याची शासनाचे दखल घ्यावी – विद्यार्थ्यांची मागणी

335
0

 

नांदुरा :- (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

महाराष्ट्रातील आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या आणि सततच्या दुष्काळाने पीडित असलेल्या विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात गेल्या ५ वर्षांपासून राजुभाऊ गावंडे या सर्वसामान्य शेतकरी पुत्राने कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता गरिबांचे शेतकर्यांचे मुले मुली शिकाव्या यासाठी शेतकरी पुत्र अभ्यासिका नांदुरा येथे सुरू केली.या अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली.जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू व्हावी.आणि याच तळागाळातील मुलांना सरकारी सेवेत रूजू करून त्यांचे अठराविश्व दारिद्र्य दूर व्हावे.याचे प्रामाणिक प्रयत्नांनी अभ्यासिकेतील ८३ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली ते राजुभाऊ यांनी स्थापन केलेल्या शेतकरीपुत्र अभ्यासिकेमुळे. त्यामुळे या महान व्यक्तीची शासनाने दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात यावे. यामुळे अनेक लोक यातून प्रेरणा घेऊन गावागावात शेतकरी पुत्र अभ्यासिका सुरू होतील आणि प्रत्येक गावातून MPSC /UPSC मधून शासकीय सेवेत रुजू होतील. अशी मागणी शेतकरी पुत्र अभ्यासिकेमधील शेकडो विद्यार्थिनी निवेदनाच्या माध्यमांतून तहसीलदार यांच्याकडे केली.

Previous articleफ्रन्टलाइनमध्ये पत्रकारांनाही कोरोनाची लस द्या व कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम द्या… टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
Next articleभारतीय जनता पार्टी च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here