Home विदर्भ शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकट

शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकट

279
0

 

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पातुर तालुक्यातील शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकटाचे सावट निर्माण झाले असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये नगदी व अल्पावधीत येणाऱ्या मुग उडीद पीक पासुन पेरणी खर्च ही वसुल झाला नसल्याची वास्तविकता आहे तर पातुर तालुक्यात नुकतीच ढगफुटी झाल्याने शेती पीकासह खरडून गेली आहे तर वन्य प्राणी यांच्या मुक्तसंचारामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपीकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील शेतकऱ्यांचे ज्वारी पीकांची प्रचंड नासाडी केली असल्याची वास्तविकता आहे तसेच कपाशी पिकावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या समोर आस्मानी संकटासह सुलतानी संकट उभे ठाकले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे खरडून गेलेल्या शेतीचे तसेच वन्य प्राणी यांच्या मुक्तसंचारामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण संमनधीत विभागाकडून करण्यात येवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे

Previous articleअतिवृष्टीमुळे पातूर तालुक्यातील केळीचे नुकसान राहेर
Next articleखासदार प्रतापराव जाधव कोरोना पॉझिटिव्ह;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here