Home Breaking News शेतकऱ्यांच्या मांगण्यासाठी स्वाभिमानी चे खातखेळ ग्रापंपचायत समोर धरणे आंदोलन 

शेतकऱ्यांच्या मांगण्यासाठी स्वाभिमानी चे खातखेळ ग्रापंपचायत समोर धरणे आंदोलन 

321
0

 

 

जिल्ह्यात ओला दुुष्काऴ जाहीर करुण. नुकसान भरपाई व पिक विमा मिळण्यासाठी २१ आक्टोबर रोजी संग्रामपुर तहसिलवर प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक मुक्काम मोेर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील हजारो शेतकरी तहससिललाच मुक्कामी असल्याची माहीती सरकारला कळताच. त्या मोर्चाची सरकारने दखल घेतली. मदत व पुनर्वसन मंत्री मा.विजय वडेट्टीवार यांनी माजी खासदार राजु शेट्टी यांच्या सोबत चर्चा करुण मोर्चातील मागण्या कँबिनेटच्या बैठकित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.पंरतु सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही. त्यामुळे सरकारला ईशारा म्हणून मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्याभरात गावातील प्रत्येक ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांचे एकदिवसीय धरणे आदोंलन करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता या वर्षी सतत पावसाने झालेल्या नुकसान
भरपाई म्हणून राज्य सरकारने सरसकट हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी.कंपनिने १००% पिकाचा विमा मंजुर करावा.मागिलवर्षी आनलाईन नोंदि करुनही सरकारने मका खरेदि केला नाही अशा मका उत्पादक शेतक-यांना प्रति किव्टिंल ७०० रुपये अनुदान द्यावे.कर्ज माफि पासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त करा. सततच्या दुष्काळाने हतबल झालेल्या शेतमजुरांना दर महा २००० हजार रुपये खावटी भत्ता द्या. माईक्रो फाईनान्स कंपनि कडुन होणारी सक्तिची वसुलि थांबवा.लोड शेडिंग बंद करुण.कृर्षी पंपाना १२ तास विज द्या.लाकडाउन काळातील घरगुती विज बिल माफ करा. ह्या मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात खातखेळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. व ग्रामपंचायत मार्फत मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री साहेब यांना.निवेदन देण्यात आले संकटाने खचुन न जाता लढण्यासाठी समोर यावे हा लढा शांततेचा मार्गाने सरकारला ईशारा म्हणुन देत आहोत पंरतु मागण्या मान्य न झाल्यास पुढचा आंदोलनचा टप्पा आक्रमक व सरकारच्या आटोक्याच्या बाहेरचा असेल असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शासन प्रशासन ला दिला आहे. या वेळेस स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे. हरी तायडे, मुकुंदा भाऊ उन्हाळे, पिंटू उन्हाळे, ऋषिकेश काळुंगे, सागर जमाव,प्रकाश वगारे स्वाभिमानी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्तित होते. उपस्तित होते.

Previous articleमलकापूर विधानसभा मतदारसंघात मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होणार-आमदार राजेश एकडे
Next articleमृग बहार न बहरल्याने संत्रा उत्पादकांची दिवाळी अंधारात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here