श्रीसंत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था पंढरपूर येथे भाविकांनसाठी भजन किर्तनाचा कार्येक्रम.

 

यावल (प्रतिनीधी )विकी वानखेडे

तालुक्यातील
किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल चे चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषधे प्रशासन विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांनी श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भोजनासह निवासस्थानाचीही व्यवस्था केली असून, दरवर्षी मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया संख्येने या निवासस्थानात आसरा घेतात तसेच सकाळ संध्याकाळ येथे भजन व कीर्तनाचे भक्तीमय कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते तर संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील हे स्वतः येथे येणाऱ्या भावीकांची विचारपूस करण्यासह त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करूण देतात येथे जळगाव जिल्ह्यातील बहुतेक वारकरी भावीक येतात येथे बांधण्यात आलेले निवासस्थान हे भावीकांनसाठी वर्षभर सेवा देते.भाविकांच्या सेवेसाठी नेहमीच अग्रेसर राहणारे अध्यक्ष विजयकुमार पाटील, ह.भ.प.लिलाधर महाराज,प्रमोद महाजन यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थीत असतात यावेळी किर्तनाच्या कार्यक्रमात मोठया संख्येत भाविकांनी सहभाग घेतला .

फोटो- श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपूर येथे किर्तनाचा आनंद घेताना भाविक.

Leave a Comment