सचिन वाघे प्रतिनिधी
हिंगणघाट:- समाजाला कीर्तन- अभंगाच्या माध्यमातून शिकवनी देणारे व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती दि. 8 जानेवारी 2022 रोज गुरुवाराला स्थानिक नवयुवक शिवाजी दुर्गा मंदिर , तेलीपुरा चौक हिंगणघाट येथे उत्साहात साजरीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री बालाजी गहलोद व येरंडेल तेली समाज विदर्भ महिला उपाध्यक्ष हेमा ताई दुरबुडे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गजेंद्र नागोसे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते मंदिर समितीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
त्यानंतर प्रमुख पाहुणे हेमा ताई दुरबुडे यांनी संताजीच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी संकलन करून लिहिलेला तुकाराम महाराजांचे साहित्य व गाथे विषयी माहिती दिली अध्यक्ष भाषणातून श्री गजेंद्र नागोसे यांनी श्री जगनाडे महाराज हे समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे म्हटले त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन उपस्थित नवयुवक व समाज बांधवाना केले.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार श्री राजेश मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजना करिता संजय कावळे,गजु वरघने,अतुल वैरागडे, राजेश खानकुरे,विक्कि सहारे,विक्की नागोसे,गौरव सहारे,गौरव मुळे,नरेश कुंभारे, कैलाश सहारे,पवन गाले,शुभम साठोने,कपिल भजभुजे, रविंद्र सहारे,नागेश कैकाडे,धनराज कोलते,सचिन सहारे,ऋषभ खानकुरे, गणेश सहारे, यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाला मंदिर समितीचे सदस्य तसेच परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.