संग्रामपुर मित्र परिवार आघाड़ी व प्रहार जनशक्ति पक्ष यांनी वृद्धाश्रमात केली दिवाळी साजरी

 

संग्रामपूर मित्र परिवार आघाडी तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज तेल्हारा तालुक्यातील दहीगाव (अवताडे )येथील वृद्धाश्रमात भेट देण्यात आली , या वेळी *”माय ही माय असते, दुधावरची साय असते”* *”तर बाप हा बाप असतो, घराचा मुख्य खांब असतो”* या प्रचलित म्हणीची प्रचिती मात्र उलट असल्याची जाणीव झाली या भेटीत अनेक वृद्धांनी आपापल्या व्यथा सांगितल्या या घरातील खंबलाच आत्ता वृद्धाश्रमाचा सहारा घ्यावा लागत आहे. तर ती माय जी एके काळी दुधावरची साय होती तिलाच आत्ता मायेच्या ममतेची गरज जाणवली खरच आपल्या ग्रामीण भागात ही आत्ता वृद्धाश्रमाची गरज आहे असे जाणवले , केंद्र सरकार चे तुटपुंज्या मानधनावर चालत असलेला हा वृद्धाश्रम अद्वितीय आहे येथे जवळपास 25 महिला व पुरुष आश्रय घेत असून तेथील कामकाज व दिनचर्या वाखांन्या जोगी आहे सकाळी 6 वाजेपासून सुरू होणारा दिवस दररोज चे दिनचर्येत कधी संपते समजत ही नाही , या मध्ये सकाळी योगा, प्राणायाम, त्या नंतर चहा नाश्ता , पेपर वाचणे ,tv पाहणे तसेच ध्यान धारणा सतसंग असे विविध कार्यक्रम दररोज घेण्यात येतात तर करमणूक साठी विविध उपक्रम राबवण्यात येतात खरच या वृध्श्रमाला भेट देऊन कृतज्ञ झाल्या सारखे वाटले या वेळी वृध्श्रमतील वृद्धांना दिवाळी फराळ किट, फळ , तसेच स्वेटर व ब्लँकेट चे वाटप करण्यात आले , या वेळी संग्रामपूर मित्र परिवार आघाडी चे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरभाऊ पुरोहित, संत गुलाबबाबा विद्यालयचे प्राचार्य तथा नगर सेवक श्री अशोक थोटांगे सर, प्राध्यापक श्री हरिभाऊ तायडे सर, श्री सारंगधर इंगळे, नगर सेवक श्री मुन्ना मोरखडे, श्री अतुलभाऊ वानखडे , हमीद भाई पाशा , असिफ भाई, श्री मोहन उकर्डे, विजयभाऊ वानखेडे , संतोष भाऊ अंबलके, जाबिर शेख हे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी येथून प्रेरणा व आशीर्वाद घेऊन भविषयत असेच काहीतरी करण्याचे मनोमन ठरवले……

Leave a Comment