Home Breaking News संतापजनक….. सहा महिन्यांच्या पोटच्या तान्ह्या मुलीला रस्त्यावर फेकले

संतापजनक….. सहा महिन्यांच्या पोटच्या तान्ह्या मुलीला रस्त्यावर फेकले

616
0

 

चिखली : दि २५ ऑक्टोबर रोजी चिखली शहरातील बस स्टँड समोरील आशीर्वाद मेडिकल समोर एका पतीपत्नीचे भांडण सुरू झाले असता त्यांनी रागाच्या भरात पोटच्या सहा महिन्याच्या मुलीला त्याच ठिकाणी रस्त्यावर फेकून दिले, त्या ठिकाणी असलेल्या फुल विक्रेत्यांनी सदर रेतीवर बाळ रडत असल्याचे पत्रकार भरत जोगदंडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तात्काळ रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील व सामाजिक कार्यकर्ते भारतीय मानवाधिकार चे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांना फोन करून त्या ठिकाणी बोलावले असता त्यांनी तास भरापासून रडत असलेल्या बाळाला उचलून दूध,पाणी पाजून शांत केले व सदर मुलीला सांभाळण्याची तयारी प्रशांत डोंगरदिवे यांनी दाखवली घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन आजू बाजूला बाळाच्या पालकांची विचारपूस केली असता तब्बल दोन तासाने सदर मुलीचे आई वडील त्या ठिकाणी आले असता त्यांना बाळाला या ठिकाणी का फेकले असे विचारले असता त्यांनी बेजबाबदार उत्तर देताच प्रशांत ढोरे पाटील यांनी त्या बेजबाबदार पालकाच्या श्रीमुखात वाजवली व येथेच्छ लाथा बुक्क्यांनी बदाडून नंतर समज देऊन सदर बाळाला तिच्या आईच्या स्वाधीन करून दिले, प्रशांत डोंगरदिवे यांच्या अंगावर सदर बाळाने शी, सु केली असता पोटच्या गोळ्या प्रमाणे त्यांनी तिला डायपर्स घालत असतांना बघून उपस्थितांना ही भरून आलं ,जिथे रक्ताच्या नात्यांना पोटच्या गोळ्याची काळजी नाही तिथे हे सामाजिक कार्यकर्ते धाऊन आले.

Previous articleपरखेड महसुल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित करणेबाबत सत्याग्रह शेतकरी संघटना व समस्त शेतकरी
Next articleजिंतूर सेलू तालुक्यातील अतिवृष्टीतुन वगळलेली महसूल मंडळे अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करा -मा गाजी आ.विजय भांबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here